अर्थ व सांख्यिकी संचालनालय ही महाराष्ट्र शासनाची प्रमुख सांख्यिकी संस्था म्हणून कार्यरत असून मंत्रालय स्थित नियोजन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. श्री. कृष्णा फिरके संचालनालयाचे कार्यालय प्रमुख (अतिरिक्त कार्यभार ) असून संचालनालय हे प्रशासकीय इमारत, मुंबई उपनगर जिल्हा, वांद्रे (पूर्व), येथे स्थित आहे. तर इलेक्ट्रॉनिक आकडेवारी संस्करण केंद्र हे मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन येथील चौथ्या व सातव्या मजल्यावर स्थित आहे. कार्यालयीन सांख्यिकी गोळा करणे, सर्वेक्षण, गणना व कार्यालयीन सांख्यिकी उपलब्ध नाही अशा बाबींसाठी विशेष अभ्यास घेणे, अशा संकलीत माहितीचे विश्लेषण करणे, महत्वाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन करणे, नियमीतपणे सांख्यिकीय प्रकाशने प्रकाशित करणे, सांख्यिकीय कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे, राज्य शासनाच्या विविध विभागातील सांख्यिकीय कक्षांतील कामाचे समन्वयन साधणे व त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे आणि राज्य शासनास आर्थिक व सांख्यिकीय बाबींवर सल्ला देणे, ही संचालनालयाची प्रमुख कार्ये आहेत. राज्यातील प्रमुख सांख्यिकीय कार्यालय म्हणून संचालनालय हे राज्य शासन व केंद्र शासन यांच्या दरम्यान सर्व सांख्यिकीय बाबींसाठी दुवा म्हणून काम करते. या संचालनालयामार्फत तसेच शासनाच्या इतर विभागांमार्फत गोळा होणा-या संख्यिकीय माहितीचे संस्करण या संचालनालयाच्या इलेक्ट्रॉनिक आकडेवारी संस्करण केंद्रामधून करण्यात येते. |
|